Tuesday, July 23, 2013

I LOVE YOU TOOO

ती - काय रे चूप का आहेस आज?
.
तो - नाही ग कुठे काय
.
ती - मग कसला विचार करतोस एवढा? .
तो - काही नाही ग कसलाच नाही
.
ती - मी ऐकलंय छान छान कविता करतोस, मग आता पण काही मनात चालाय का ?
.
तो - तसं काही नाही ग आता काही नाही आहे मनात आणि तुला कोणी सांगितलं मी कविता करतो ते?
.
ती - तुझेच सर्वे मित्र बोलत असतात खूप छान कवीता करतोस ते आणि मला संग माझ्यावर कधी कवीता केली आहेस का ?
.
तो - एकदम गप्प आणि मनातच बोलतो माझ्या कवीता तुझ्या पासूनच सुरु होतात आणि तुझा पासूनच संपतात
.
ती - काय रे गप्प का झालास परत बोलत नाहीस, चल आज तू माझ्यावर एक कवीता कर मला सुधा ऐकायची आहे कशी कवीता करतोस ते?
.
तो - मनातच बोलतो आज चांगली वेळ आहे सर्व सांगतो कवितेतून जे होईल ते होईल बघू पुढे .
ती - करतोस ना कवीता आता आजून किती वाट बघायची आहे आणि तिच्या मनात सुधा हेच चाललं असता निदान कवितेतून तरी सर्व सांगेल जे माझ्या मनात आहे, बघू काय बोलतो ते
.
तो - मैत्री पासून आपलं नातं सुरु झालं अनोळखी आपण एक मेकांशी बोलू लागलो मैत्रीच नातं कधी घट्ट झालं हे कळलच नाही मैत्री अशी होती कि सर्व गोष्ठी एकमेकांशी वाटू लागलो मैत्री तुझी मला खूप आवडते पण
मन माझं कधी तुझ्या प्रेमात रंगायला लागलं कळलंच नाही जेव्हा पासून आयुष्यात आलीस त्या दिवसा पासून माझं आयुष बदलूनच गेलं आता तुझी सवय झाली आहे मला जेव्हा तुला भेटतो तेव्हा खूप छान वाटतं तुझ्याशी दूर जावंसं वाटतच नाही आणि तुला एक दिवस नाही भेटलो तर मनात सारखं तुझाच विचार चालू असतो तू समोर असलीस कि तुलाच बघावसं वाटतं तू लांब असलीस कि नझर तुलाच शोधत असते माझं दिवस तुझ्या पासून सुरु होतो आणि रात्र तुझ्या आठवणीत संपते आता तर माझं आयुष्य तुझ्या विना अधुरच आहे मनापसून प्रेम करतो तुझ्यावर पूर्ण आयुष्य जगायचा आहे तुझ्याच बरोबर तुला खूप खुश ठेवायचं आहे आणि तुझं आयुष्य आनंदाने फुलवायचं आहे पण तुझं मनात देखील तेच आहे जे माझ्या मनात आहे हे मला माहित नाही.

ती - ऐकूनच डोळ्यात पाणी येतं आणि त्याचा मिठीत जाऊन रडू लागते आणि त्याला सांगते किती दिवस हे ऐकायची वाट बघत होते, एवढं वेळ लावलास बोलायला, माझ्यावर प्रेम करतोस मग माझं मन नाही ओळखलस का तू
.
तो - खरा सांगू मला देखील वाटत होतं तुझं माझ्यावर प्रेम असेल पण घाबरत होतो जर तसं नसेल तर
एक चांगली मैत्रीण देखील गमविन मी पण आज ठरवलं जे होईल ते होईल तुला सांगणारच माझं प्रेम आहे तुझ्यावर, "
I LOVE YOU "
.
ती - आनंदाचे अश्रू थांबतच नव्हते आणि त्याला आपल्या घट्ट मिठीत घेऊन बोलते
" I LOVE YOU TOOO".
एकमेकास प्रेम द्यावे न प्रेमाच्या गावा जावे. प्रेमरुपी जिवन आनदांने जगावे.

Reactions: