डोळ्याना सांगीतलय मी, आज रात्र जागायची आहे....निघालेल्या प्रत्येक अश्रुची कथा ..आज तिला सांगायची आहे...

ऐकलय की, तुझी आठवण येणार आहे. आज परत मला, तीमाझ्यातूनच नेणार आहे...

डोळ्याना सांगीतलय मी, आज तिलातिच्याकडुनच मागायची आहे, पापण्यानो तुम्ही मिटू नका , आज रात्र जगायची आहे....

एचंद्रा जरा एकडे बघ, तिची आठवण येणार आहे... तुझ्या सौम्य प्रकाश दे, मला आठवणीत ती आज भेटणार आहे..

एअश्रू, तू थांब रे, इतके दिवस आलास ना.. माझा म्हणता म्हणता, तू ही तिचा झालास ना...

तू आलास की, पापण्या मग मिटायच म्हणतात..

एपापण्यानो तुम्ही मिटू नका, निघालेल्या प्रत्येक अश्रुची कथा .. आज तिलासांगायची आहे... डोळ्याना सांगीतलय मी, आज रात्र जागायची आहे...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top