मला माझीचं खुप चिड येते

तुझी आठवण आली की, मला माझीचं खुप चिड येते..
संपले ना सर्व तुझ्याकडुन, मग का मी असा स्वःताला त्रास देते..

नको त्या खोट्या शपथा, नको त्या सुखद आठवणी..
आठवुण सर्व काय करु, मग डोळ्यात माझ्या येतं पाणी..

आठवणीँनी पाणावलेल्या डोळ्यांत, तुला इतरांपासून लपवू कशी..
भरभरुन वाहणाऱ्या अश्रुंना थोपवून, खोटे हसु आणू तरी कशी..

ते अश्रूं लपवण्याच्या प्रयत्नांत, मग मी तुलाचं दोष देत राहते..
आणि या खोट्या प्रयत्नांत, तुला आणखीनचं आठवत राहते..
Share on Google Plus

About Hanumant Nalwade