तेव्हा तू मला आवडतेस

तू जेव्हा म्हणतेस ,  “तू नेहमीच असा वागतोस  मुद्दाम मला छळतोस ”,

तेव्हा तू मला आवडतेस..

तू जेव्हा म्हणतेस, “मला तुझ्याशी बोलायचे नाही आता ..”आणि लगेच विचारतेस ,“बोलतोस का आता ?”,

तेव्हा तू मला आवडतेस..

तू जेव्हा म्हणतेस,“ परत जर असा वागलास तर..मी तुला कायमची सोडून जाईन... लक्षात ठेव ” ,

तेव्हा तू मला आवडतेस..

तू जेव्हा म्हणतेस ,”मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय .. आणि मला माहितीये की तुही माझ्याशिवाय..”
आणि पटकन मला मिठी मारतेस,

तेव्हा तू मला आवडतेस...
तेव्हा तू मला आवडतेस तेव्हा तू मला आवडतेस Reviewed by Hanumant Nalwade on December 09, 2013 Rating: 5
Powered by Blogger.