स्वप्न प्रत्यक्षात उतरायला बऱ्याच गोष्टींची गरज असते. त्या सर्व गोष्टी आपल्याला हव्या तशा आणि हव्या त्या वेळी हाताशी याव्या लागतात.त्या येतातही; पण बराच वेळा निसटूनही जातात आणि आपलं स्वप्न
रंगवायला काही रंग कमी पडतात की काय, याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. मग आपल्याला वाटायला लागतं- ठरवलं तसं घडलं नाही आणि जे घडलं ते आपलं मन मनायला तयार होत नाही. आपण मनात साठवलेलं स्वप्न जसंच्या तसं आपल्याला हवं असतं.
थोडेसे रंग नसले म्हणून प्रत्यक्षात आपल्या समोर आकाराला आलेलं स्वप्नही मग आपल्याला भावत नाही. यात स्वप्नांचा दोष नसतो. दोष असतो तो आपल्या मनाचा.रंगांच्या रांगोळीपुढं रंग नसलेली साधी रांगोळीसुद्धा तिचं अस्तित्व दाखवत असते, हे आपण विसरतो.आपल्या आयुष्यात हे असंच व्हायला पाहिजे होतं, असं म्हणत, ते तसं का झालं नाही म्हणून स्वतःला आणि सभोवतालच्या माणसांना किंवा परिस्थितीला दोष देत आयुष्यभर कुढत राहतो. रडत राहतो.
उदास होतो. माणसाच्या आयुष्याचं एकूण मोल लक्षात घेऊन माणसानं आपलं असं वागणं
कुठं तरी थांबवायला हवं..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top