तू नसलीस कि

कसं तुला सांगू..? तू नसलीस कि माझं काय होतं..?
डोळ्यांत डबकं, ओठांवर अबोल आणि मनात गडद काळ्या अंधाराचं ठाय होतं...

तू नसलीस कि मला माझ्यात राहवत नाही...तुझ्याशिवाय चेहरा इतर कोणताही पाहवत नाही...

तू नसलीस कि नजर फक्त तुझ्या वाटेकडे असते...दिवसाची रात्रीकडे आणि रात्रीची पहाटेकडे असते...

तू नसलीस कि भोवताली सा-या निसर्गाला मी तुझं वर्णन सांगत असतो...वा-याच्या येणा-या प्रत्येक झुळूकेमध्ये तुझा श्वास शोधत असतो...

Photo

तू नसलीस कि मला अन्नं गोड लागत नाही...चव,बेचव सार अर्थहीन होतं, घास खर्ड्याचा पाण्याचा थेंबहि मागत नाही...

तू नसलीस कि आटतो झरा शब्दांचा, मग काही केल्या झरत नाही...गहिरा दाह एकांताचा आता कवितेतही उतरत नाही...

तू नसलीस कि दृष्टी शून्यात असते आणि ह्रिदय खिन्नं असतं...नुसतीच टिकटिक घड्याळाची, पण आयुष्य अगदी सुन्नं असतं...

तू नसलीस कि बघ माझं जिणं किती विदीर्ण होतं...आसुसलेल्या मनासहित तनही खिळखिळीत जीर्ण होतं....
Previous Post Next Post