Friday, November 22, 2013

प्रेमाचा जमाखर्च ....

ङोळ्यात पाणी,अन् ऊरल्यातफक्त तुझ्या आठवणी's photo.

आज तुझ्या मनात जे काही आहे ते सांगुन टाक ...

चल आज तू आपल्या प्रेमाचा जमाखर्च मांडून टाक ....

ऑफिसचा जमाखर्च रोजच करतेस...एक दिवस  आपल्या प्रेमाला दे ...

त्या जमाखर्चात माझ्या ऐन तारुण्याच्या पहाटेची वर्षे  मांडून दे ....

मग आपण बघू कोण फायद्यात आहे...कोण तोट्यात आहे  ते .....

पण विसरु नकोस, प्रेमात मात्र दुसर्याच्या फायद्यात आपले सुख  असते ....

अग वेडे ...असे हिशोब कधी एका दिवसात जुळत  नसतात ....

जोडलेली नाती अशी एका  दिवसात तुटत नसतात ...
Reactions: