Tuesday, October 15, 2013

का असी घाबरतेस

ठाउक आहे मला तु हि  माझ्यावर प्रेम करतेस,
पण प्रेम करते तुझ्यावरच  हे गुपीत मनातल ओठावर
आणन्यास थोडी घाबरतेस

समोर येताच मी नकळत  गालात स्मित हासतेस,
नजरेला नजर भिडता लाजेने  लाजुन चुर चुर होतेस..

मनातल्या भावना  मनातच लपवतेस,
पण शब्दा ऐवजी नयनाणे  सार काहि बोलुन जातेस.

मी नजरे आड जाई परियंत  मलाच पाहत बसतेस,
मी गेल्यावर माञ वेड्यागत  एकटीच हसत बसतेस..

आठवण माझी आली की, मनातल्या मनात हुर हुर करतेस,
अन कोनाच्या हि नकळत  आठवणीत माझ्या रडत बसतेस

प्रेम करतेस का ग माझ्यावर म्हटल की काहिहि न बोलता,
मुक बधीर होउन गप्प बसतेस

का ग शोना तु असे करतेस ..??तुझ माझ्यावर प्रेम असुनही,
मनातल गुपीत ओठावर  आणन्यास का असी घाबरतेस.?? 
Reactions: