Tuesday, October 15, 2013

बायको कशी असावी

सुंदर नसली तरी चालेल,पण चार चौघात उठून दिसणारी असावी ...

बायको कशी असावी,समजुद्दार नसली तरीचालेल,पण माझ्या भावना समजून घेणारी असावी...

बायको कशी असावी,प्रेमळ नसली तरी चालेल,पण माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी असावी ...

बायको कशी असावी,हुशार नसली तरी चालेल,पण सर्व गोष्टी हुशारीने हाताळणारी मात्र असावी ...


बायको कशी असावी,धैर्येवान नसली तरी चालेल,पण दुःखाच्या क्षणी मला सावरणारी असावी ...

बायको कशी असावी,गमतीदार नसली तरीचालेल,पण माझ्यासारखी खोडकर नक्की असावी ...

बायको कशी असावी,हसताना गालावर खळ्या पडल्या नाहीत तरी चालेल,पण तिच्या हसण्यातून दुस्रांच्या दुखांवर फुंकर मारणारी आणिहसू फुलवणारी मात्र असावी...

कशीही असुदे पण बायकोपेक्षा एक मैत्रीण म्हणून जास्त असावी
Reactions: