Tuesday, October 15, 2013

प्रत्येक जण प्रेमात पडतो

प्रेमात कधी घडत  तर कधी बिघडत कारण प्रत्येक जण प्रेमात पडतो

प्रत्येक जण कोणावर  तरी प्रेम करतो पण त्यांना सांगताना  का तो अडतो कारण प्रत्येक जण प्रेमात पडतो

त्याची वाट बघताना  ती अन तिची वाट  बघताना तो का बरं चिडतो

कितीही भांडलो तरी  पुन्हा एकत्र येण्यासाठी  का बरं धडपडतो कारण प्रत्येक जण प्रेमात पडतो

त्याने जरा दुसरीकडे बघितले  तर ती अन तिने बघितले तर तो का ओरडतो गर्दीत
तिला कुणाचा धक्का लागू नये  म्हणून का तो तिला जवळ ओढतो

कारण प्रत्येक जण प्रेमात पडतो का कुणी आयुष्यभर साथ  देण्याचे वचन देऊन आपला हात सोडतो

का कुणी दाखवलेली  स्वप्नं एका क्षणात मोडतो अन का आपण हस-या
चेह-याने या जगासमोर रडतो कारण प्रेमात कधी घडत  तर कधी बिघडत..
Reactions: