साथीला आता तु नाहीस, हे ह्रदयाला कसं समजावु,
अविरत पाझरणार्‍या डोळ्यांना, तु नसण्याचं शल्य कसं दाखवु.....

तुझ्या पासुन दुर होण,माझ कोणतही पथ्य नाही....
कारण फक्त एकच की, पुन्हा एकदा प्रेमात पडुन विरह सहन करण आता मला शक्य नाही....।।

प्रत्येक वेळी भेटीच वचन मीच मागायचं का  पहा कधीतरी स्वताहून देता आल तर...पाखर सुद्धा भेटतात परस्परांच्या ओढीन  बघ त्यांच्या कडून काही घेता आल तर ...

मनाला बांध घातला होता हृदयातला पूर थोपवला होता..
पण डोळ्यांनी चुगली केली होती अन आसवांनी दगा दिला होता..
नज़र ना लागो मला कुणाची  म्हणून तू माझी नजर काढून गेली .........
आठवणीत राहावे हे प्रेमळ क्षण  म्हणून तू गालावर माझिया काळजाचे बोट लावून गेली

अज़ून तरी मी तुला काही निरुत्तर केले नाही....
तरीपण माझ्या प्रश्नाना  तू कधि उत्तर दिले नाही....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top