फक्त तुझा विचार, मनात दुसर काहीचं नसतं,
माझं सारं विश्व, तुझ्याभोवती घुटमळत असतं...
तू कुठेही असलीस तरी, डोळ्यात तुला पाहत असतं,
तुझ्यासोबत प्रत्येक क्षण, माझं मन भरकटत असतं...
रात्री गाढ झोपेतही, तुझचं स्वप्न पाहत असतं,
तुझ्याचं धुंदीत मला विसरून, माझं मन जगत असतं...
कसा लागला हा नाद, माझचं मन विचारत असतं,
का प्रेमात पडल्यावर, असचं सारं होत असतं...
मला काय ठाऊक होतं, प्रेमात असंच घडत असतं,
नाहीतर माझं मन, तुझ्यात कधीचं गुंतलं नसतं...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top