
मला स्वतःपेक्षा जास्त जीव लावणारं, ठेचं लागता मला पटकन सावरणारं.....
मी रागात असता, मला प्रेमाने समजून घेणारं.....
असेल का कुणी ???
माझ्या सोबत आयुष्यभर,
प्रेमाने चार पावलं चालणारं.....मी सुखात आणि दु:खात असताना,नेहमी मला हक्काची साथ देणारं.....
असेल का कोणी ???
माझ्या प्रेमळ जीवाला,नेहमी जिवापाड जपणारं.....
मरण माझ्या समोर असता,
जिवाची पर्वा न करता मला वाचवायला येणारं....
"कदाचित नसेलहि....."?