
माझी आठवण आल्यावर,कधी तरी स्वतःवर चिडशील तु,कधी तरी स्वतःशीच भांडशील तु.....
माझी आठवण आल्यावर,कधी तरी तडफडशील तु ,कधी तरी तळमळशील तु.....
माझी आठवण आल्यावर,खुप चांगला होता प्रियकर माझा,कधी तरी असे म्हणशील तु.....
माझी आठवण आल्यावर,कधी तरी एकटी पडशील तु,कधी तरी चाचपडशील तु.....
माझी आठवण आल्यावर,कधी तरी घुटमळशील तु,कधी तरी बेचैन होशील तु.....
पण ???
तेव्हा निघून गेलो असेल मी,या जगातून खुप खुप दूर,
देह माझा निवांत झाला असेल,चिता जळत असेल माझी सारणावर,निघेल श्वासांचा धूर.....
सा-या सुखाची होईल माती,विरहाच्या दुःखाची झाली असेल राख,डोळेही कायमचे बंद होतील,
या जगाचा अखेरचा निरोप घेतील.....
माझी आठवण आल्यावर,कधी तरी प्रेमाला समजशील तु,कधी तरी मला तु.....