Friday, August 23, 2013

सांगायचे आहे तुला

जरा ऐक ना,
काही
सांगायचे आहे तुला.......तुला भेटताना होणारी ह्रुदयाची धडधड ऐकवायची आहे तुला, तुला पाहताना हळूच झुकणारी माझी नजर दाखवायची आहे तुला, तुझ्या बरोबर चालताना हां रस्ता कधी संपू नये हे सांगायचे आहे तुला, तू सोबत असताना सुर्याची किरणे देखील गार वाटतातहे सांगायचे आहे तुला, तू नसताना तुझाच चेहरा नजरेमधे असतो माझ्या हे सांगायचे आहेतुला, तुज्या बरोबर बोलताना होणारी शब्दांची धडपड ऐकवायची आहे तुला,तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा हे सांगायचे आहे तुला, तुझ्या बद्दल माझ्या मनातल्या भावना सांगायच्या आहेत तुला.......
Reactions: