Thursday, August 15, 2013

प्रेम करशील ना ग

रोजच माझे एक स्वप्न असते त्या स्वप्नात मी तुलाच पाहतो..
असेल ते इतरांना साधारण जरी तरी मला ते स्वप्न सुखच भावते..
न माहित कोण , कशी आहेस तू? कि माझ्या मनातील पुसटशी प्रतिमाच तू..
तुझ्या विचारांत गुंग मी होतो माझ्या हृदयातील स्पंदनेच तू..
विचार येता मनी कशी असशील तू तेव्हाच चेहऱ्यावर माझ्या लाली येते हळू..
तुझ्या स्वप्नात रंगुनी जातो ग मी सखे ग कधी स्वप्न हे सत्यात आणशील तू..
तू अशी तू तशी खूप स्वप्ने रंगविली ग प्रत्येक रंगात तुला नव्याने पाहिले आहे..
रंगांना माझ्या एक नवी चमक देशील ना ग तुझ्या येण्याचीच वाट मी पाहत आहे..
माझ्या स्वप्नांचा आधार आहेस ग या स्वप्नांना तुझी साथ दे ना ग तू..
तुझ्या आयुष्याचा सोबती व्हायचंय ग मला तुझा जीवनसाथी मला करशील ना तू..
तुझ्यातच माझे जग एकवटायचंय ग मला तुझ्यावर जीवापाड प्रेम करायचं मला..
तुझ्या नावाने जगात वावरायचंय ग मला तुझ्यातच माझे स्वप्न संपवायचंय मला..
स्वप्न एवढेच आहे ग माझे तू भेटाविस हि एकाच आस आहे..
माझ्यासाठी हि तू स्वप्न पाहशील ना ग? तू पण माझ्यावर जीवापाड प्रेम करशील ना ग ?
Reactions: