अविस्मरणीय संध्याकाळ

अविस्मरणीय संध्याकाळ........
"अरे .... अमित एक सांगू का?" हसू नकोस हा..
मी हसत हसत म्हणालो "हा सांग... नाही हसत.."
"अरे! काल कि नाही तू माझ्या स्वप्नात
आला होतास..."
मी .. "हो का ! ....."मग कायं केलं मी येऊन
हां..हां ."?
डोळ्यात लाजरेपणा दिसला .. "छे! पुरे
आता तुझा चावटपणा.. तू फक्त आला होतास
आणि मग गेलास.. "
" ऑय्येंग ! मी आलो... नि गेलो!! .. असं होऊच
शकत नाही ... मी आलो तर नकीच काहीतरी romantic
करून गेलो असेन."
“हाहाहा “
"हसतेस काय? .. खरचं.. !"
ती - "अरे वेडू मग सांग न तूच तू काय केलंस
ते.."
असं होय मग ऐकच..
हो ऐकतेय .. व्हा सुरु..
थांब मीच सांगतो मी काय केल ते ..
शांत संध्याकाळ झाली होती.. थंड
वारा सुटला होता... सगळं कसं शांत...
निःशब्द.. कदाचित ती संध्याकाळ आपलीच वाट
पाहत होती .. आपण भेटण्याची ..
मी आलो .. तुझ्या जवळ .. तुझं ते
स्मितहास्य...लुकलुकणारे डोळे.. थरथरणारे
ओठ.. आणि थोडीशी कुडकुडणारी तू...
तुझ्या डोळ्यात पाहिलं आणि पहातच राहिलो ..
बराच वेळ मी हरवूनच गेलो होतो..
तुझ्या डोळ्यात ... आपण बसलेल्या झाडाखाली..
पानांची सळसळ कानावर ऐकू पडत होती..
तुझा हात हातात घेतला... तु ही तो घट्ट धरलास
मी तुला कधीच न सोडून जाण्यासाठी ...
तू मधेच हसायला लागलीस.. माझं तसं रूप
पाहून.. आणि नकळत म्हणालीस...
"असं काय रे बघतोस..? आज मी काय वेगळी दिसते
आहे का? "
मी म्हणालो - "तू रोज वेगळी दिसतेस मला..
डोळेभरून पाहतच राहवसं वाटत "
तू थोडंस चिडून – “ पुरे नको करू
बनवाबनवी.. !”
मी हलकेच तुझ्या केसातून हात फिरवला.. तु
ही बेधुंद होऊन डोळे मिटून घेतलेस..
नंतर माझे हात तुझ्या गाली लावून...बराच वेळ
तू माझ्यकडे पहात राहिलीस..
जवळ आलो तुझ्या मी..खूप.. एकमेकांचे श्वास
ऐकू यायला लागले..होते ..
हृदयाची धडधड हळू हळू वाढत होती ..
हाताचा घट्टपणा अजून घट्ट होत चालला होता...
त्यात थंड वार्याची एक झुळूक येऊन हळूच
तुझे केस माझ्या चेहऱ्यावर उडवून गेली ....
आणि नकळत माझे डोळे मिटून गेले....
ऐकता ऐकता .. ती हरवून गेली.. नि मधेच उदास
स्वरात म्हणाली..
“अमित! बरं झालं हा ...हे स्वप्नच होतं..ते ”
माझा चेहरा लगेच पडला... म्हणजे.. ती खरच
आपल्यावर प्रेम नाही करत .. असं वाटलं..
मी काही म्हणायच्या आत तिने सारं ओळखलं
होतं
"अमित आय luv u रे..... किती छान बोलतोस रे
तू ?...
खरंच अस घडेल का रे कधी? ...
स्वप्नात नाही तर सत्यात तरी कधी?
तू माझं होशील का ..?"
मी - "मी तुझाच आहे गं.." फक्त तुला ते
उशिरा कळतंय ...
तिच्या स्वप्नात येऊन
मी सर्वस्वी तिचा झालो.. प्रत्यक्षात
तिचा होण्याआधी … भावनेनी व्याकूळ
दोघे..एकमेकांच्या घट्ट मिठीत अडकलो..
अन अशी एक संध्याकाळ अविस्मरणीय ठरली....

Share on Google Plus

About Hanumant Nalwade