एकदातरी प्रेम करावे.

नबोलता मनातले कोणीतरी ओळखावे, नसांगताही कोणीतरीप्रेम करावे. मनाला हवे तेच का सांगावे, नसांगताही कधीतरी प्रेम करावे. मनातल्या भावानांसोबत भरभरून जगावे, नसांगताही कधीतरी प्रेम करावे. प्रेम आपल्याही वाट्याला यावे, नसांगताही कोणीतरीप्रेम करावे. नेहमीच बह्यसौंदर्य का पाहावे, कधीतरी अंतरर्गातही झाकावे, नसांगताही केव्हातरी प्रेम करावे. नेहमी राग रुसवा आणि का भांडावे, नसांगताही कोणीतरीप्रेम करावे. तिने त्याला अन् त्याने तिलासहज ओळखावे, नसांगताही कोणीतरीप्रेम करावे. सांगता न येण्याएवढे कठीण काकरावे, नसांगता बोलून सांगण्यायेवढे सोपे करावे. इतरांपेक्षा थोडे वेगळे, नसांगताही प्रेम करावे. आयुष्यात एकदातरी प्रेम करावे.

एकदातरी प्रेम करावे. एकदातरी प्रेम करावे. Reviewed by Hanumant Nalwade on July 20, 2013 Rating: 5
Powered by Blogger.