एव्हढा राग का आहे

तुझ्या बोलण्याचा मला राग आहे पण का कुणास ठाऊक, नेहमीच तुझ्याशी बोलावासं वाटतं.... तुझ्या सवयीचा मला राग आहे पण का कुणास ठाऊक, सगळं काही तुला सागावसं वाटतं.... तुझ्या हसण्याचा मला राग आहे पण का कुणास ठाऊक, नेहमीच तु हसावसं वाटतं.... तुझ्या आठवणीचा मला राग आहे पण का कुणास ठाऊक, तुझ्या आठवणीतच रहावसं वाटतं.... तुझ्या "miss call"चा मला राग आहे पण का कुणास ठाऊक, तरीही तुला फ़ोन करावासा वाटतो.... का कुणास ठाऊक...? तुझी आठवण येताच, डोळ्यात अलगद पाणी येते....., का कुणास ठाऊक...? डोळे अलगद मिटताच, तु नेहमीच समोर दिसतेस...., का कुणास ठाऊक...? थंड हवेची झुळूक येताच, तु आल्याचा भास होतो..., का कुणास ठाऊक...? श्वास घेताच रुधयाचे ठोके, तुझ्या नावाने पडू लागतात..., पण का कुणास ठाऊक...? मला तुझा एव्हढा राग का आहे...? मला तुझा एव्हढा राग का आहे...?
एव्हढा राग का आहे एव्हढा राग का आहे Reviewed by Hanumant Nalwade on July 08, 2013 Rating: 5
Powered by Blogger.