Tuesday, July 30, 2013

तुझी आठवण ही

ही अखेरची तुझी आठवण ही अखेरचीतुझी आठवण यापुढे माझ्या मनात तुझे येणे जाणे असणार नाही ... यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं माझ्या मनात बरसणार नाही ..... यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस माझ्यामनाच्या अंगणात रिमझिमणार् नाही ....!
तुझा हळवा प्रेमळ आपलेपणा जसास्वीकारला होता तसाच तुझा माझ्यावरचा रागही मंजूर ...!
म्हणूनच , हे अखेरचे काही अश्रू , फक्त तुझ्यासाठी ... पण यापुढे माझ्या आसवांच्या मैफिली तुझ्यासाठीजमणार नाहीत ... आणिहे अखेरचे काही शब्द , फक्त तुझ्यासाठी ...
पण यापुढे माझ्या कविता तुझ्या आठवणी मागणार् नाहीत ... यापुढे कधीही माझ्याकविता तुझ्यासाठीअसणार् नाहीत ...
ही अखेरची तुझी आठवण ... यापुढे माझ्या मनात तुझे येणे जाणे असणार् नाही ...
Reactions: