आय लव यु टू

हे दोघे कोण आहेत ? ते तुम्हाला सांगायची गरज
नाही. इथेही एक प्रेमी युगुल आहे आणि टिपिकल
प्रेमामध्ये होते तशी यांचीही अनबन
झालेली दिसते . हिप्रेमिकांची भांडणे फार अजब
असतात . कोणत्याही शहाण्या माणसाने त्यात
पडण्यात काहीच अर्थ नसतो .
कोणत्याही फुटकळ कारणावरून प्रेमिक
एकमेकांशी असे कडाकडा भांडतात
किपाहणाऱ्याला वाटाव,आता हे
काही उभ्या जन्मात एकमेकांचे तोंड पाहणार
नाहीत …. प्रत्यक्षात त्याचसंध्याकाळी ते
हातात हात घालून फिरताना दिसतात .
त्यांच्या भांडणात पडणारा तिसरा माणूस
मात्र दोन्हीकडून वाईट होऊन बसतो .
हि भांडणे किती वरवरची आणि निरर्थक
असतात , त्याचा हागमतीशीर
नमुना …………………
तो- तू मला समजूनच घेत नाहीस ?
ती- किती समजून घ्यायचं मी ?
तो- ठीक आहे , मग आजपासून आपले मार्ग वेगळे …
ती- हो मलाही कंटाळा आलाय आता !
तो- हे या आयुष्यातलं आपल शेवटच संभाषण …
यापुढे आपण एकमेकांना भेटणार नाही, दिसणार
नाही, आपल्या वाटा आता कायमच्या वेगळ्या, तू
नीट राहा, काळजी घे …. गुड बाय ….
ती- सेम टू यु, गुड बाय फॉरएवर …
(त्या रात्री दोघेही तळमळत जागेच असतात
पहाटेपर्यंत… पहाटेच्यासुमारास
त्याचा मोबाईल वाजतो … मेसेज आलाआहे … )
तिचा मेसेज - हाय !
त्याचा मेसेज - काय ?
तिचा मेसेज - अजून जागाच आहेस ?
त्याचा मेसेज - तू तरीकुठे झोपली आहेस ?
तिचा मेसेज - जेवला नसशील ना अजून?
त्याचा मेसेज - तुला भूक लागलीये वाटत आता ?
तिचा मेसेज - एक सांगू ?
त्याचा मेसेज - काय ?
तिचा मेसेज - तुझ्याशिवाय नाही राहू शकत
मी…
त्याचा मेसेज - स्टुपिड , मी सुद्धा नाही राहू
शकत यार तुझ्याशिवाय … तुझ्याच मेसेज
ची वाट पाहत होतो ….
तिचा मेसेज - मग तू का नाही केलास फोन? तू
म्हणजे ना असाच आहेस …
त्याचा मेसेज - कसाही असलो तरी …. आय लव यु
….
तिचा मेसेज - इश्श्य ! आय लव यु टू …
Previous Post Next Post