माफ आहे..

तू माझ्याशी नाही बोललीस मला दुख होणार नाही तू माझ्याशी नाही हसलीस मला राग येणार नाही कारण तुला तर माहीतच आहे कितुला सर्व माफ आहे...

तू नाहीदिलास reply मला काही वाटणार नाही तू नाहीउचललास phone मला यातना होणार नाहीत कारण तुला तर माहीतच आहे कितुला सर्व माफ आहे...

तू विसरलीस मला मीतुला विसरणार नाही तू रडविलेस जरी मला तरीही मी रडणार नाही कारण तुला तर माहीतच आहे कितुला सर्व माफ आहे...

तू सोडून गेलीस मला तरी मी वाट पाहणार अखेरच्या श्वासापर्यंत फक्त तुझा अन तुझाच राहणार कारण तुला तर माहीतच आहे कितुला सर्व माफ आहे... कितुला सर्व माफ आहे...

माफ आहे..  माफ आहे.. Reviewed by Hanumant Nalwade on July 24, 2013 Rating: 5
Powered by Blogger.