Tuesday, July 23, 2013

सवयच आहे तिला...

सवयच आहे तिला रोज विनाकारण माझ्यावर चिडण्याची

उगाच गाल फुगवून रुसून बसण्याची सवयच आहे मला समजूत तिची घालण्याची

त्यात हि ती नाक मुरडायची पण रागावल्यावर खूप सुंदर दिसायची सवयच आहे तिला

कधी कधी मला खूप मारण्याची स्वतःलाच लागले म्हणून ओरडण्याची सवयच आहे तिला

जाताना घरी लहान मुलासारखे रडण्याची अलगद गालावर मुका देण्याची.....!! सवयच आहे तिला...

Reactions: