काही असतात अशाआठवणी, ज्या मनात वसुनी राहतात, कोण कुठली माणसे काही, आपलीशी मग वाटतात, असेच नाते माझे जुडले, होते जे अनोळखी, वेगवेगळे जरी किनारे, पण ती लाट माणुसकीची . . .
असा वेगळा प्रवास झाला, त्यापैलतीरावर जावून थांबला, भाषा वेगळीप्रांत हा भिन्न, कसे जमेल हा प्रश्न दाटला, गाठ भेट ती अशीजाहली, नव मायेचीफुंकर लाभली, अनोळखी त्या नात्यामध्ये, वेगळीच मग गोडी वाढली. . .
लग्नाचा तो योग होता, कार्य असे तिथे घडत होते, त्या क्षणांचा आनंद घेत, मन पाखरू होवून गात होते, अशी पाखरे त्या फांदीवर, खेळ सुखाचा खेळत होते, काय थोर नि काय लहान, प्रेमात सगळे गुंफले होते . . .
असा विरघळलो रंगात त्यांच्या, जसामी हि एक पाखरू, क्षणांत मने जिंकूनघेईल, अशा गायीचं मी वासरू, एक विनंती करतो देवा, असाहास्यरंग वसू दे, तुटून सगळी दुखाची गाठ, एक प्रेम गाठ बसू दे . . .
असा क्षण हा जीवनात आला, जो कधी न मी विसरणार, असाच फिरत प्रत्येक तीरावर नाती मी जोडणार . . . अशीच नाती मी जपणार . . .