एक खांदा नेहमीच हवा असतो……
धडधड बंद झाल्यावर चार खांदे तर कुणीही देत,
पण धडधडताना मात्र.... एक खांदानेहमीच हवाअसतो
डोकं ठेवल्यावर एक हात हातात घेऊन दुसरा हात डोक्यावर ठेऊन,
शांतपणे सगळ सगळ ऐकून घ्यायला…… एक खांदा नेहमीच हवा असतो
आनंदात मिळणारे हात अन हसणाऱ्या चेहऱ्याचे बुरखे नेहमीच भेटतात,
दुखात पडलेलीआसवे टिपायला …… एक खांदा नेहमीचहवा असतो
पटेल तेच समजावून घेणारे आणि आवडेल ते ऐकणारे सदैव हजर असतात,
पण न पटेल ते पटवून घ्यायलाहि …… एक खांदा नेहमीच हवा असतो
शहाण्यासारख वागून जगाचे तत्वज्ञान पाजाळाणारे एकाऐवजी हजार असतात,
पण वेड्यासारखा जगून आपल्याच धुंदीत धुंद ह्वायला…… एक खांदा नेहमीच हवा असतो .