म्हणजे प्रेम

मला माझ्या मित्राने विचारले कि प्रेम म्हणझे नेमके काय ?
मी त्याला सागितले की, कितीही जवळ जाणार असेल तरीगाडी सावकाश
चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम....
दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे
महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम....
कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे
आजी-आजोबा म्हणजे प्रेम.... कितीही वाद झाले तरी दादा जेवलास
का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम... पगार कितीही कमी असेल
तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळघेणारा भाऊ म्हणजे प्रेम....
आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून
जेवणाचा डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम.
Previous Post Next Post