नाही विसरू शकत मी
तुला,
तुझ्या सहवासातील त्या अनमोल क्षणांना.....
तुझ्या गोड आठवणींना,
पानगळ कधीचं झालेली तुझ्या जाण्याने.....
मीबसलेय कुरवाळत त्यापाचोळ्याला,
बघत पान विरहीत वृक्षाला.....
सांज येते गारठावाढतो,
तु नसतोस शाल बनायला.....
तुझी आठवण येते नकळत,
आपसुकचं उब जाणवते तुझ्या मिठीची.....
चांदण्या हसतात चंद्र खुणावतो,
लपंडावाच्याखेळात मला बोलावतो.....
बघ आलीचं तुझीआठवण,
खेळूया का रे चांदण्या मोजण्याचाखेळ.....
कित्येक ऋतु बदलले,
तरी मी तिथेचं पाचोळ्यांशी खेळत.....
तुझ्या आठवणींशी गप्पा मारत,
नाही विसरू शकत मीतुला.....
तुझ्या सहवासातील त्या अनमोल क्षणांना...!!
तुझ्या सहवासातील त्या अनमोल क्षणांना...!!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top