एक अश्रू.. तुझ्यासाठीचजपून ठेवलेला.. जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं.. तेव्हा.. तोअश्रू.. हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो.. पण वाहत मात्र नाही,
एक पाऊल.. तुझ्यासाठीचअडखळणारं, तुझ्यासोबत चालण्यासाठीचआतुरलेलं.. वाटेवरल्याएकटेपणात.. तुझी पाऊलखूण शोधणारं..
एक नजर.. जी सारखी तुलाचशोधते... प्रत्येकाच्या डोळ्यात.. तुझीच छबी शोधते.. मागे वळून .. पुन्हा पुन्हा.. तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..
एक मिठी.. तुझ्याचसाठी रिकामी.. तुझ्याशिवाय मोकळी..
एक कुंचला.. तुझ्या येण्याकडे लक्ष असलेला.. तू येऊन पुन्हा.. रंग भरशील माझ्याआयुष्यात.. अशी आस लावणारा..
एक जीव.. तडफडणारा.. असहाय्य.. तुझ्याविना.. तुझ्याचसाठी....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top