तुझं हसणं तुझं हसणं ...... नभात चांदणं उमलवत तुझं हसणं ...... दवबिंदूंनीअंगण सजवत तुझं हसणं ...... कळीलाही हसणं शिकवत तुझं हसणं ...... फुलालाहीगंध पुरवत तुझं हसणं ...... वाऱ्यालाही झुलायलालावत तुझं हसणं ...... पानांनाही डोलायला लावत तुझं हसणं ...... सूर होऊन बेभान करत तुझं हसणं ...... कोकिळेचं भान हरवत तुझं हसणं ...... माझा पाठलाग करत तुझं हसणं ...... माझ्या मनास गुंतवत तुझं हसणं ...... इंद्रधनुचे रंग लेवून येत तुझं हसणं ...... तुझ्या रंगात रंगवून टाकत तुझं हसणं ...... येतांना वसंत घेवून येत तुझं हसणं ...... जातांना तो गंध ठेवून जात तुझं हसणं ...... मनी प्रीतीचे तरंग उठवत तुझं हसणं ...... मनास वेड लावत सारा आसमंत फिदा झालाय प्रिये तुझ्या हसण्यावर कळलं असेलं तुलाही मीकां भाळलो तुझ्यावर..
हसणं तुझं हसणं
Hanumant Nalwade
0
Tags
हसणं तुझं हसणं