बोलणेही बंद केले..... .भेटणेही बंद केले.
नाव माझे मी तिच्याशी जोडणे ही बंद केले .

पेटली ही आग ऐसी त्या नकाराची तुझ्या की
मी दिवे ही बंद केले ,चांदणेही बंद केले ....

देव मी समजून गेलो,भेटला मज दगड तेथे
हात मी जोडून आता ,मागणेही बंद केले ...

एवढ्या उमदा प्रकारे तोडले नाते तिने की
मी अता नाते कुणाशी, जोडणे ही बंद केले...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top