तुझं हे एक बरं असतं.

तुझं हे एक बरं असतं थोडंसं रडतेस
बाकि सारं काही माझ्यावर सोडतेस
म्हणतेस अरसिक मजला आणी
छान गाणं म्हणतो तेव्हा चक्क झोप काढतेस
प्रेमच नाही म्हणत उगा रागावतेस
पन जवळ घेता जोरात चिमटी काढतेस

तुझं हे एक बरं असतं
मला नेहमीच बुदधु समजतेस
पण सारे प्रश्न ही मलाच विचारतेस
किती बडबड करतोस असं रोज म्हणतेस
पण फोन न केल्यास केवढी झापतेस
कसले कपडे घालतोस म्हणुन नेहमी ओरडतेस

तुझं हे एक बरं असतं
एकटी असल्यावर मलाच आठवतेस
भेटायला आल्यावर निघायचं सांगतेस
माझ्याकडे चंद्र तारे सारे काही मागतेस
खुप पैसे खर्च करतो मग बोल लावुन राहतेस
माझ्या जेवणाची काळजी करतेस
आणी स्वत: उपाशी राहतेस

तुझं हे एक बरं असतं कशीही वागतेस
पण मला मात्र खुप आवडतेस...
तुझं हे एक बरं असतं. तुझं हे एक बरं असतं. Reviewed by Hanumant Nalwade on June 29, 2013 Rating: 5
Powered by Blogger.