शेवटपर्यंत शेवटपर्यंत .

शेवटपर्यंत शेवटपर्यंत .. नाही मी भेटलो तिला नाही ती भेटली मला
दोघांच्या गावातल अंतर सुद्धा नवतं फारस तरीसुद्धा नाही मी भेटलो तिला नाही ती भेटली मला

दोघांचं होत एकमेकांवर अतूट प्रेम होती एकमेकांवर जीवापाड माया
पण जीवनातील असंख्य अडचणीमुळे त्यांच्यावर राहिली संकटाची छाया
शेवटपर्यंत शेवटपर्यंत ............


आयुष्यातील पहिलं प्रेम माझं ते सुद्धा नवतं माझ्या 

नशिबी कुणास ठाऊक होती ती कमनशिबी कि मीच झालो अपयशी जाईन जाईन म्हणत होतो पण
जमलंच नाही जायला ती सुद्धा डोळे लाऊन बसली होती दाराकडे
शेवटपर्यंत शेवटपर्यंत............


आज येईन उद्या येईन असा सारखा सांगायचो मी तिला
ती सुद्धा होती वेडी प्रेमात माझ्या आस लाऊन बसली मनाला
पण तरीही नाही जमल मला तिला भेटायला नाही ती भेटली मला
शेवटपर्यंत शेवटपर्यंत............


दिवसा मागून दिवस सरत चालले होते पण प्रेम करायचा काही थांबलं नव्हतं
जरी नव्हतं बघितला होत तिला प्रत्यक्षात तरीसुद्धा होईल कधी न कधी आपली भेट
या आशेनेच जगत होतो शेवटपर्यंत शेवटपर्यंत...........


अचानक एके दिवशी असं काही घडलं
कि ज्याने मनातील स्वप्नांचा अक्षरशः चुरा झाला
लागली अशी ठेच मनाला जी नाही विसरू शकत मी आयुष्याच्या
शेवटपर्यंत शेवटपर्यंत..............
शेवटपर्यंत शेवटपर्यंत . शेवटपर्यंत शेवटपर्यंत . Reviewed by Hanumant Nalwade on April 02, 2013 Rating: 5
Powered by Blogger.