मी काय तुझ्या मनात आहे.

कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.
नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवातोस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधते
जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात
आहे.
सा-या जरी बंद
वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.
तुला मागुही शकत नाही मी आज
तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार
काही तुझ्या उत्तरात आहे.
हो आज या नात्याला नाव अस कोणतच
नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात
आहे.
मला फ़क्त तु हवा आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात
आहे.
कधी तरी सागं
भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे ...
मी काय तुझ्या मनात आहे. मी काय तुझ्या मनात आहे. Reviewed by Hanumant Nalwade on April 04, 2013 Rating: 5
Powered by Blogger.