खेळ मांडला ..

तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सर ना ह्यो भोग कशापाई
हरवली वाट दिशा आंधरल्या दाही

ववाळूनी उधेळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला

खेळ मांडला...खेळ मांडला ....
खेळ मांडला...देवा...खेळ मांडला

सांडली गा रितभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीवगा.. खेळ मांडला
दावी देवा पैल पार.. पाठीशी तू र्हा उभा
ह्यो तुझ्याच उंबर्‍यात.. खेळ मांडला

हे... उसवलं गणगोत सारं
आधार...कुणाचा न्हाई
भेगाडल्या भुई पाई जीनं..
अंगार जिवाला जाळी..

बळ दे झुंझायाला.. तिरतेची ढाल दे
इनविती पंच प्रान.. जीवारात ताल दे
करपलं रानं देवा.. जळलं शिवारं
तरी नाही धीर सांडला...
Share on Google Plus

About Hanumant Nalwade