तुला त्याची किंमत नसेल पण

आशा नसतानाही लढन सोप नसतं ग...
तुझ्यासाठी फक्त एक विनोद असेल पण... एक तर्फी प्रेम करण सोप नसत ग...
तासन तास तुझ्या एका नजरे ची वाट पाहण् एक झलक मिळाली की जस देव पावन चुकून हसलीस की वेडच होऊन जान मग रात्र काय आणि दिवस काय
झोपेच काम फक्त जागत राहन मग मनाला खुळे ठरवून सारा दोष त्याच्यावर ढकलून स्वताची समजूत काढण् सोप नसतं ग...
तुझ्याच विचाराने डोक घुटालनं एका स्वप्नाच्या मागे बाकी सगली ध्येय अर्पण करण एक आशे मागे जीव कुरवाळण... आनंदाचे स्तोत्र तूच रागाचे कारण तूच विचारातहि तूच स्वप्नातहि तूच ध्येयात हि तूच एक मात्र आशा त्या आशेतही तूच मग एकांतात हि एकट राहन सोप नसतं ग...
काळजी करणाऱ्याशी खोट बोलणं मित्रांची नजर चुकवणे सतत एकच प्रयत्न हा वेडेपणा लपवण पण, या डोळ्यांना कस रोखायचे यांचे काम मला फक्त मला वेड ठरवण् कोणाची दया कोणाचे हास्य कोणाची चीड लोकांची करमणूक बनन सोप नसतं ग...


सन्मान, इज्जत,अब्रू, अहंकार, हे शब्द हो शब्दच ना... कोणाच्या पायाशी अर्पण करण् आता हास्य होईल ओठांवर स्वार कि लागेल आता डोळ्याची धार
हे ठरवायचा हक्क दुसऱ्याला देण स्वतःला चिरडून टाकण्याचा हक्क कुणाला देण सोप नसतं ग...
तुझा तिरस्कार करण्याच प्रयत्न करण् रोझ स्वतःला ठणकावून सांगण
वेड्या सारखा स्वताच काहीतरी ठरवून घेण.. रोज सकाळी एक द्रुड निश्चय करण आणि भिजण्या आधी पुन्हा त्या मोबाइल मध्ये तुझ्याच मेसेज ची वाट पाहणे.. सोप नसतं ग...
डोंगर एवढे स्मित हास्य ओठांवर झेलण मेफिलींच्या गर्दीत लोकांच्या गराड्यात एकटे राहणे एकांतात स्वतःची सोबत नकोशी वाटण मनाच्या जखमांना स्वताच दगडाने ठेचण अश्रू संपे पर्यंत रडण आणि अश्रू हि सोडून गेल म्हणू पुन्हा जीव तोडण सोप नसतं ग...
पोहता येत नाही म्हणुन पाण्याची ओढ असण विझली तर चटके नही बसणार या आशेन आगीतच उभी राहन कळेल ग तुला अवघड असत प्रेम करण् कोणाची जबरदस्ती होती का या प्रश्नाला वारंवार टाळण पण जबरदस्ती नसतानाही स्वतःची आहुती देण सोप नसतं ग...
तुला त्याची किंमत नसेल पण आशा नसतानाही लढन सोप नसतं ग...
तुझ्यासाठी फक्त एक विनोद असेल पण एक तर्फी प्रेम करण सोप नसतं ग...
Share on Google Plus

About Hanumant Nalwade