काही माणसं मैत्रीनं आपल्या खांद्यावर हात टाकतात
नि आपल्या बेसावध क्षणी आपल्याला
स्वतःचा खांदा देऊन टाकतात,

काही माणसं वरनं हापुस आंब्यासारखी दिसतात
चवीनं त्यांचा स्वाद घ्यावा तर
नेमकी बाठीला लागलेली आसतात,

काही मानासं वरनं सुकलेल्या चिखलासारखी असतात
जमीन कडक म्हणुन पाय टाकावा तर
आपल्याला आणखीनच आत खेचतात,

नि काही मानसं
पिंपळाच्या पानासारखी आसतात
त्यांची जाळी झाली तरी
मनाच्या पुस्तकात जपाविशी वाटतात........आयुष्यभर.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top