इतकं सोपं असतं का गं..
आयुष्यात कुणाला एवढं स्थान देणं..
आणि तेवढ्याच सहजपणे ते हिरावून घेणं..
...सोप्पं असतं ना फार.. कुणी आला .. कुणी गेला..
काय फरक पडतो ..हो ना.. चूक तुमची नाहीच मुळात..
चूक आमचीच ..एवढं प्रेम.. एवढी काळजी.. 
नको एवढं प्रेम उधळायची सवय..अंगलट येणारी ...
अतिपरिचयात अवज्ञा करणारी..पण आम्ही असेच असतो गं,
आतूनबाहेरून सारखेच ..आडपडदा वगैरे नसणारे .. 
ओळखायचं काम खरं तुमचंच.. जवळ करायचं कामही तुमचंच..
खरा खोटा ठरवायचं..शेवटचा अधिकार तुमचाच..
बरंच काही असतं तुमच्या हातात.. फक्त जरा किंमत असुद्या.. 
बस.. पुरे आहे आम्हाला..आणि काही नको.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top