प्रेम म्हणजे दूसर्यासाठी जगणे.

ती म्हणाली होती प्रेम आहे माझे तुझ्यावर नाही उमजला अर्थ तेव्हा तिच्या बोलण्याचा माझ्याजवळं ती नाही, आता प्रत्येक आठवण सांधतो आहे न कळलेल्या प्रेमाचा अर्थ बांधतो आहे कदाचीत प्रेम म्हणजे आपुलकीच्या बोलांसाठी आतुर्लेले कान पावसात शब्दांच्या चिंबं विसरतातं देह्भान कदाचीत प्रेम म्हणजे भेटीच्या ओढीत झुरणारी ती का फक्त एका कटाक्ष्यासाठी त्याने ओवळून टाकलेला जीव कदाचीत प्रेम म्हणजे पाणीदार बोलके डोळे शब्द नको तिला उसने, ती डोळ्यातूनच बोले कदाचीत प्रेम म्हणजे प्रत्येक क्षणाला तीचा विचार पहिला आजही त्याने अर्धा घास तिच्यासाठी ठेवला कदाचीत प्रेम म्हणजे पापण्यांमधे जपलेला सागर ठेचं लागतच त्याला, तीला फुटलेला अश्रुंचा पाझर कदाचीत प्रेम म्हणजे आठवणींचे धूके दाटलेले ती निघून गेल्यावर अश्रूंच्या दवबिंदूसंगे मला वेढ आता मात्र शब्धही लागतात अपुरे पडू भावनांची गर्दी कशी कागदावर उतरवू ? पण आता कळतयं.... प्रेम म्हणजे दूसर्यासाठी जगणे आपले विसरून दुसर्याच्या विश्वात रमंणे............ प्रेम म्हणजे दूसर्यासाठी जगणे....................
Share on Google Plus

About Hanumant Nalwade