केलाय का कधी तुम्ही कुणाला propose ?
केलाच कधी जर तुम्ही suppose तो क्षण नेहमी आठवणीत राहतो
नकळत कधीतरी मनात डोकावून पाहतो मानो याना मानो…………
पण तो क्षणच खूप वेडा असतो. ती “हो” बोलेल कि “नाही” बोलेल?
कि,जे मैत्रीचे नाते आहे तेहि तोडेल?

मनात सगळ्या विचारांचा काहूर माजतो
पुरुषा सारखा पुरुष पण साला प्रेमात लाजतो
मानो याना मानो………… पण तो क्षणच वेडा असतो.
एरव्ही जराही वेळ नसलेले आम्ही propose करायला मात्र बरोबर वेळ साधतो
होकार तिचा ग्राह्य धरून मनात स्वप्नाचा बंगला बांधतो,
मानो याना मानो………… पण तो क्षणच खूप वेडा असतो.
परीक्षेच्या result ची वाटली नाही भीती तेवढा तो या प्रेमाच्या result ला घाबरतो,
दुसरे काही नको हवे असते त्याला तो फक्त तिच्या एका होकारानेच सावरतो
मानो याना मानो………… पण तो क्षणच खूप वेडा असतो.
तिचे उत्तर मिळेपर्यंत वेळ पण थांबतो, घड्याळ्याच्या काट्यावर बहुतेक चिखल साठतो
चेक करा जरा ब्लड प्रेशर propose करताना म्हणे तो शिखर गाठतो
मानो याना मानो………… पण तो क्षणच खूप वेडा असतो.
साठवून ठेवा ठेवा तो आयुष्यभर, कारण तो क्षण खूप वेगळा असतो
ती नसली तरीहि तो नेहमी साथ असतो 
मानो याना मानो…………पण तो क्षणच खूप वेडा असतो

गूगल ऐडवर्ड्स

 
Top