तू नक्कीच होशील माझी.

मी वाट पाहतोय त्या दिवसाची.... तू नक्कीच होशील माझी,
मी वाट पाहतोय त्या दिवसाची.... तू असशील माझ्या बाहूपाशी,
मी वाट पाहतोय त्या दिवसाची.... माझ्या मनीच्या भावना,
समजू लागतील तुलाही; माझी स्वप्नं सत्यात उतरतील,
मी वाट पाहतोय त्या दिवसाची.... तुझ्याही मनात रुजू लागेल,
प्रितीची निखळ भावना.... मोडून बंधनं तू येशील मजपाशी,
मी वाट पाहतोय त्या दिवसाची.... सर्वांच्या मग अनुमतीने,
नात्याला आपल्या रुप मिळेल.... तू बनशील माझी अर्धांगी,
मी वाट पाहतोय त्या दिवसाची.... आयुष्य माझे सखे,
समृध्द करशील तू सहवासाने.... आमरण आपुली साथ असेल,
मी वाट पाहतोय त्या दिवसाची....
Share on Google Plus

About Hanumant Nalwade