माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का? जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देशील का? माझ्या मनाच्या कोपऱ्यातनयनांच्या माझ्या पापण्यात थोडा वेळ विसावशील का ? माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का? तुझ्या एका नजरे साठी असतो सदा तुजपाठी मज भरकटलेल्या जीवन मार्गावर आणशील का? माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का? एकच ध्येय माझ्या जगण्याचे तुला माझी झालेली बघण्याचे करण्या मज इच्छापूर्ती तू पुढे येशील का? माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का? तुझ्यात असतो मी गंभीरकरतेस मज तू अधीर शेवटचे मागणे ..हाती हात देशील का? माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?

गूगल ऐडवर्ड्स

 
Top