प्रेम म्हणजे.

प्रेम म्हणजे....
रोज रात्री आकाशात तारा तुटतो का हे पाहणं..
आणि तुटणाऱ्या ताऱ्याकडे तो फक्त आपलाच व्हावा हे एकच मागणं ...
प्रेम म्हणजे...
डोळे बंद केले कि त्याचाच चेहरा डोळ्यासमोर येण...

आणि डोळे उघडले कि त्यालाच शोधण....
प्रेम म्हणजे...
एकांतात त्याची आठवण येण....
आणि चारचौघात सुद्धा फक्तत्याच्याच विचारात बुडणं..
प्रेम म्हणजे...
कधीही न आवडलेल्या गोष्टी...
फक्त त्याला आवडतात म्हणून आवडून घेण...
प्रेम म्हणजे...
त्याच्या गुणांवर भाळण...
पण त्या पेक्षाही त्याच्यात असणार्या दोषान सहित त्याला स्विकारण....
प्रेम म्हणजे...
त्याच या जगातील अस्तित्वसंपलय...तरी...
निव्वळ त्याला दिलेल्या वचनामुळे डोळ्यात अश्रू असून सुद्धा ओठावर हसणं असतं...
Share on Google Plus

About Hanumant Nalwade