
एक पहाट तुझ्या नजरेने पहावी...
रोमरोमात अंतरंगी तूच फक्त उरावी...
कोमेजलेल्या जगण्याला... पालवी फुटेल नक्की...
धूसर वाटही स्वप्नांची... सत्यात उतरेल नक्की...
दवबिंदूच्या थेंबावर...चमक तुझीच उरावी....
रोमरोमात अंतरंगी तूच फक्त उरावी...
बेरंग फुलाच्या गंधकोशी ... फुलपाखरू बसेल नक्की...
मोकळ्या मनाच्या आकाशी... इंद्रधनू फुलेल नक्की...
पक्षांचे होऊनि पंख... घ्यावी गगन भरारी...
रोमरोमात अंतरंगी तूच फक्त उरावी..