नवा रंग रातीचा.

काळोखी रात्र अन् चुकलेली पायवाट...
गोठलेला गारवा...अंगी शहार्‍याची लाट...

घट्ट हातात हात धरून त्याला बिलगलेली ती...
चुकलेल्या रस्त्याची खूण अनोळखी वस्ती...

फिकीर ना जगाची ना घेणे कुणाशी..
भरते पोट प्रेमाने असे जाणूणी ते उपाशी...

अशावेळी...
रस्त्याच्या कडेला झोपडे त्यांना दिसले...
पाहून एकमेका दोघे हलके गालात हसले...

त्यांची स्वप्नांची रात्र सत्यात उतरली...
जवळ घेता तिला त्याने तीही मोहरली...

चंद्र तार्‍याच्या संगे शेकोटी उजळली...
नयनांत तेव्हा त्यांच्या फक्त प्रीतीच उरली...

शिरली मिठीत त्याच्या तोडून बंध सारी...
भावना मखमली स्पर्श झाला शिदोरी...

हरवलेल्या धुंद रात्रीत दोघे हरवून गेले...
लाजर्‍या हिरव्या पानावर दवबिंदू ओघळले....

नवा रंग रातीचा त्यांना होता गवसला...
निसर्ग सुद्धा दिवसाला होता विसरला...

निसर्ग सुद्धा दिवसाला होता विसरला...
Previous Post Next Post