कोणी म्हणे तो तुझ्यावर भरभरून प्रेम करतो...
कोणी म्हणे तो तुझ्यावर आभाळाएवढा मरतो...

कोणास वाटे तू त्याच्या आयुष्याची आहे सुरूवात...

कोणास वाटे तू नाही तो दिन त्याचा आहे अंत...

कोणासाठी तू आहेस किनारा कोणासाठी नाजूक फुलपाखरू...
कोणासाठी तू होतेस सागर तर कोणासाठी कल्पतरू....

कोणासाठी तू वाट आहे कोणासाठी जगण्याची आस...
कोणासाठी तू प्रवाह आहे कोणासाठी जगण्याचा श्वास...

सारे काही ऐकूनी हसलो मी एकांतात...
आकाशात पाहिल्या लाखो चांदण्या...अन् तुला हरेक चांदण्यात...

विसरलो होतो सर्वांचे बोल... झालो होतो मी अबोल...
तुझ्यात गुंतून हरवलो गेलो खोल खोल...

सर्वत्र पसरलेली तू आणि चमचमणारी तू....
उरलो मी ना माझा आता उरली आहेस फक्त तू...
दाहिदिशांना उरली आहेस फक्त तू...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top