तिचं रुसणंहि तसं रोजचच आहे ...
तिचं होऊन जगणं अन
तिचं होऊन उरण सुद्धा रोजचच आहे...
तरी तू फसतोस रे...
आता तरी सावर रे मना... सावर तू मना...
ती फुलते तेव्हा बघ जरा तू, कळी फुलते...
नजरेच्या तीराने धरती घायाळते...
अशी अदा, तिला पाहून नभ झुकते...
ती खुललेली पाहून तिला रात्र भुलते...
रंग तिचे मोरपंखी दिसती क्षणा क्षणा...
कसे सांग? कसे सांग? सावरू या मना...
सावरू या मना...