जगण्यातला आनंद...



लोकांनी खचाखच भरलेली ट्रेन...
मुंगी शिरू शकणार नाही इतकी गच्च...

काही धक्का बुक्की करणारे...
काही रागात दुसऱ्याकडे बघणारे...
सीट वरून भांडणारे काही...
प्रवास असह्य वाटणारे काही...

कोणी मोबाईल वर गाणी ऐकणारे...
कोणी प्रेयसीशी गप्पा मारणारे...
एखाद्याची टिंगल उडवणारे कोणी...
शेजारच्या च्या खांद्यावर झोपणारे कोणी...

ही गर्दी विसरून...
दोन म्हातारे रफिचे गाणे गुणगुणत बसले...
तरुण पणाच्या आठवणीत तरुण होऊन रमले...
त्यांच्या चेहेऱ्यावर आनंद ओसंडून होता वाहत...
गर्दीत अचंबित मी एकटा... त्यांना होतो पाहत...

आयुष्य फक्त जगायचे नसते...
जगण्यातला आनंद उपभोगायचा असतो...
हे त्यांना पाहून उमगले...
ट्रेन मधून उतरताना
जगण्याचे गणित नकळत उलगडले...

Previous Post Next Post