आज पुन्हा एक कविता लहावीशी मला वाटली
डोळ्यात तिची छबी आणून कागदावर उमटावावीशी वाटली ...!!!

चेहरा तिचा आठवण्यासाठी पुन्हा आठवणीत मी हरवून गेलो
हरवून गेलो त्या आठवणीत अन बाहेर येणेच विसरून गेलो ...!!!आठवणीत जगण्याची आता सवयच आहे ह्या वेड्या मनाला
मनाशीच रोज भांडून काय कळणार तिच्या त्या मुक्त आत्म्याला ...!!!

अशीच ती अचानक मला सोडून आठवणीत गेली
आयुष्याचा रांगोळीत अन चार ठिपके देऊन गेली ...!!!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top