जगण्याची आस घेउन आलीये

मी अंधारात एकटाच असलो ना...कि सारे मला एकचं प्रश्न विचारतात...
काय रे प्रेमभंग झाला कि काय ?मी विदुषकासारखा मुखवटा चढवून हसतो अश्या प्रश्नावर....

खरचं असचं झालंय का? नाही... मला खात्री आहे कि अस झालंच नाहीये...
लोक काय काही तर्क लावतात...त्याचं तेच काम आहे म्हणा...

मला आज खूप काम आहे उशीर होईल घरी यायला...दोघांचं घरी फोन करून एकच कारण...
तुला आठवतेय का ती रात्र?...तू आणि मी रस्त्यावर दोघेच...

सोबतीला निरव शांतता...वाऱ्याची झुळूक सरकन तुला वेढून घ्यायची...
तुझ्या अत्तराच्या गंधाने रात्र मोहोरून जायची...

तू मला... मी तुला...एकमेकांच्या डोळ्यात शोधायचो...
तेव्हा तू लाजायचीस ..अन् मी...मी त्या लाजण्यावर भाळायचो...

माझा स्पर्श झाला कि तूझ थरथरण...हातात हात घट्ट धरून माझ तुला दिलासा देन...
सार काही लख्ख लख्ख अंधारातही...डोळ्यासमोर जिवंत होत अजुनही...

बरीच वर्ष सरकन निघून गेली...आयुष्य जगण्याची इच्छा सुद्धा मरून गेली...
वयाच्या सत्तरित सुद्धा डोळ्यात मात्र तूच भरली आहे...
उरलेल्या काही क्षणांत... तुला भेटण्याची आस उरली आहे...

आज भले मी एकटा असेन या वाटेवर ...तू आल्यावर रुसेण तुझ्या विचित्र वागण्यावर...
पण...
अजुनही मला खात्री आहे नकळत तू येशील...माझा थरथरणारा हात घट्ट हातात घेशील...

थरथरणारे हात, पानावलेले डोळे, आनंदाने तरुण झालेले मन...
साऱ्या दुनियेलाला ओरडून ओरडून सांगेल..बघा ती आलीये... 
मला भेटायला खरच ती आलीये...जगण्याची आस घेउन आलीये...

जगण्याची आस घेउन आलीये...
Previous Post Next Post