माणूस शोधतोय

हसत हसणारी माणसं, रडून रडणारी माणसं,
हसून रडणारी माणसं, रडून हसणारी माणसं,
मी सुखी माणूस शोधतोय.....

आहे त्यात गप्प बसणारी माणसं, गप्प बसून आत बोलणारी माणसं,
असून हि इथे नसणारी माणसं, नसून हि इथे असणारी माणसं....
मी माणूस शोधतोय.....

माणसांत राहून माणसांत रमणारी माणसं,  माणसांत राहून राहून दमणारी माणसं,
मिळूनही सगळं...मागणारी माणसं,  स्वत:च्याच सावलीमागे धावणारी माणसं,
वेड्याला वेड लावणारी माणसं.....

मी सुखी माणूस शोधतोय..... मी माणसांत सुख शोधतोय.....
मी सुखासाठी माणूस शोधतोय..... मी माणसांत राहून माणूस शोधतोय.....
Share on Google Plus

About Hanumant Nalwade